Pune l मौज मजेसाठी तरुणांनी चोरले चक्क टी शर्ट, जीन्स, परफ्यूम | Sakal Media
कापड दुकानचे शटर उचकटून आठ हजार रुपयांचा रोख रकमेसह जिन्स पँट, टी शर्ट आणि परफ्यूम असा ६२,००० रुपयांचा माल चोरी केल्याची घटना समोर आलीय.ही घटना पिंपरी चिंचवड शहरातील देहु रोड वरील एका कपड्याच्या दुकानात झाली. सर्व घटना सीसी टीव्ही फुटेज मध्ये कैद झाली आहे .ही घटना ३० जानेवारीला घडली. पहाटेच्या वेळी ५ जणांनी दुकानात प्रवेश केला आणि कपडे, परफ्यूम लंपास केले. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात देहु रोड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.